मराठवाड्याच्या पाण्यावरून पेटलं राजकारण

November 29, 2012 10:08 AM0 commentsViews: 3

29 नोव्हेंबर

मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून शेतकर्‍यांना विरोध दर्शवत आंदोलन केली मात्र आता पाण्याच्या नावानं आंदोलनांचं संकुचित राजकारण सुरूच आहे. जायकवाडी धरणासाठी आज भंडारदरा आणि दारणा धरणांतून पाणी सोडण्यात येतंय. बुधवारी मुळा धरणातून सोडण्यात आलं हे पाणी जायकवाडीच्या पाणलोटापर्यंत पोहोचलं आहे. दरम्यान, दारणा धरणावर मनसे आणि भाजपतर्फे निदर्शनं करण्यात आली. तर, श्रीरामपूरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. आधीच पाणी तुटपुंज आहे. त्याचं पाण्याचं काटेकोर आणि दूरगामी नियोजन करण्याऐवजी स्थानिक नेते आपापल्या मतांच्या खुशीकरणासाठी आंदोलनांचे देखावे करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनीही पाणी वाटपाच्या या नियोजनाचा समाचार घेतला आहे.

close