सलग तिसर्‍या दिवशीही संसदेत गोंधळ

November 26, 2012 9:21 AM0 commentsViews: 3

26 नोव्हेंबर

एफडीआयच्या मुद्यावर सलग तिसर्‍या दिवशी संसदेचं कामकाज होऊ शकलेलं नाही. आज दोन्ही सभागृहात एफडीआयच्या मुद्यावर गदारोळ झाला. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एफडीआयच्या मुद्यावर भाजप आणि डाव्या पक्षांनी संसदेत नियम 184 अंतर्गत चर्चेची मागणी केलीये. तर समाजवादी पार्टी आणि बसपाचा एफडीआयला विरोध असला तरी हे पक्ष सरकारविरोधात मतदान करण्याची शक्यता नाही. त्यामुळे संसदेत पुरेसं बहुमत असल्याचा अंदाज आल्यास सरकार नियम 184 अंतर्गत चर्चेला तयार होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

close