स्टॉकगुरू घोटाळा:दिल्ली पोलिसांचे मुंबई-रत्नागिरीत छापे

November 27, 2012 3:27 PM0 commentsViews: 5

27 नोव्हेंबर

कोट्यवधींच्या स्टॉकगुरू गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबई आणि रत्नागिरीत छापे टाकले. आरोपी उल्हास खरेशी संबंधित 20 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्याच्या नावावर औद्योगिक जमीन, बनावट नोंदणी असलेल्या 7 लालदिव्याच्या कार असल्याचं आढळून आलंय. त्याच्याकडे 48 महागडे मोबाईल, स्पाय कॅम घड्याळं, 18 पॅन कार्ड आणि एटीएम कार्डही पोलिसांना सापडले आहे. शिवाय 131 चेक बुक आणि पैसे मोजण्याचं मशिनही मिळालंय.

close