शिवाजी पार्कवर सेनेला एकाच दिवसाची होती परवानगी

November 29, 2012 10:35 AM0 commentsViews: 8

29 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील अंत्यसंस्काराच्या जागेवरुन महापालिका प्रशासनानं आपला अहवाल पोलिसांकडे सादर केलाय. या जागेची शिवसेनेला देण्यात आलेली परवानगी ही फक्त 1 दिवसापुरती होती असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. अंत्यसंस्कारासाठी असलेली गर्दी लक्षात घेता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारासठी महापालिकेनं परवानगी द्यावी अशी सुचना पोलीस आयुक्तांनी पालिका आयुक्तांना केली होती. यानुसार आयुक्त सीताराम कुंटे यांनी एका दिवसाची परवानगी दिली होती. पण त्यानंतरही शिवसेनेनं तिथे मंडप टाकून ती जागा ताब्यात ठेवल्याचा अहवाल पालिका प्रशासनानं पोलीस आयुक्तांना दिला आहे. मात्र उघडपणे या विषयावर महापालिका अधिकार्‍यांनी बोलायला नकार दिला आहे.

close