रत्नागिरीत बिबट्याचा फासात अडकून मृत्यू

December 3, 2008 11:58 AM0 commentsViews: 160

3 डिसेंबर, रत्नागिरी दिनेश केळुस्कर रत्नागिरी जिल्ह्यातील शिरंबवली गावात एका चार वर्षाच्या बिबट्याच्या मादीचा फासात अडकून मृत्यू झालाय. हा फास गावातल्याच कुणीतरी लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. आज सकाळी दहा वाजता ही घटना उघडकीस आली. रानात गुरं घेऊन गेलेल्या महिलेच्या अंगावर हा बिबट्या गुरकावून गेल्यानंतर तो फासात अडकला. गावकर्‍यांनी वनविभागाला कळवलं होतं पण वनविभागाच्या कर्मचार्‍यांना घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यानं या बिबट्याच्या मादीचा मृत्यू झाला. बिबट्याची मादी केबल तारेच्या फासात अडकली. अर्धा तास ती मृत्यूशी झुंज देत होती. याबाबत तपास करणार असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलंय.

close