सोलापुरात महिलेला विवस्त्र करुन मारहाण; 9 जणांना अटक

November 23, 2012 2:14 PM0 commentsViews: 18

23 नोव्हेंबर

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना सोलापूरमध्ये घडली. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात 9 नराधामांनी एका महिलेलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. दुधनीच्या आठवडी बाजारात पीडित महिला आपल्या पतीसोबत खरेदी करण्यासाठी आली होती. यावेळी या दाम्पत्यावर 9 जणांनी अचानक हल्ला चढवला. पीडित महिलेच्या पतीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला बेदम मारहाण केली. यानंतर या टोळक्यानं या महिलेला विवस्त्र करून बाजारातच मारहाण केली. अख्ख्या बाजारात ही घटना घडत होती. मात्र लोक फक्त बुजगावण्यासारखी उभी होती. कोणीही या महिलेला वाचवण्यासाठी पुढं आलं नाही. विवाहबाह्य संबंधातून ही घटना घडल्याचं बोललं जातंय. मात्र त्या महिलेची जरी चूक असली तरी सुद्धा एका महिलेल्या विवस्त्र करून मारहाण करणे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली. याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली असून सर्वांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

close