रिकी पाँटिंग क्रिकेटला करणार अलविदा

November 29, 2012 10:57 AM0 commentsViews: 45

29 नोव्हेंबर

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन रिकी पाँटिंगनं अखेर निवृत्तीची घोषणा केली आहे. पर्थ टेस्टनंतर पाँटिंग क्रिकेटला अलविदा करणार आहे. गेल्या दीड वर्षांत आपली कामगिरी समाधानकारक होत नसल्यानं आपण निवृत्ती घेत असल्याचं पाँटिंगनी म्हटलं आहे. 38 वर्षांचा पाँटिंग पर्थमध्ये शेवटची टेस्ट खेळणार आहे. आपल्या बॅटिंगनं मैदान गाजवणार्‍या रिकीनं, कॅप्टन म्हणूनही ऑस्ट्रेलियाला अनेक विजय मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं दोन वेळा वर्ल्ड कपही जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम कॅप्टनमध्ये त्याची गणना झाली. त्यानं 77 टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला 48 विजय मिळवून दिले.

17 वर्षांच्या करिअरमध्ये आपल्या क्रिकेटनं जगाला वेड लावणार्‍या या पंटरला पर्थ टेस्टनंतर अलविदा केलं जाईल. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड पॉटिंगच्या नावावर आहे. पर्थ हे पाँटिंगसाठी खास ग्राऊंड आहे. 1995 ला याच पर्थच्या स्टेडियमवर पाँटिंगनं लंकेविरुद्ध पदार्पण केलं होतं आणि त्यानंतर जागतिक क्रिकेटनं एक सर्वात यशस्वी करिअर पाहिलं. आपल्या टेस्ट करिअरमध्ये पाँटिंगनं 167 टेस्ट मॅच खेळल्यात. त्यात त्यानं 52 च्या ऍव्हरेजनं 13 हजारांपेक्षा जास्त स्कोर केलाय. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला डॉन ब्रॅडमननंतरचा सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन खेळाडू मानलं गेलंय.

रिकी पॉटिंग यशस्वी कारकीर्द

– टेस्ट क्रिकेट – सर्वाधिक रन्स करणारा दुसरा खेळाडू – 13,366 – वन डे क्रिकेट – सर्वाधिक रन्स करणारा दुसरा खेळाडू – 13,704 – टेस्ट क्रिकेट – सर्वाधिक टेस्ट खेळणारा तिसरा खेळाडू – 167 – टेस्ट क्रिकेट – सर्वाधिक सेंच्युरी करणारा तिसरा खेळाडू -41 – टेस्ट क्रिकेट – सर्वाधिक मॅच जिंकणारा कॅप्टन -48 – टेस्ट क्रिकेट – टीमच्या विजयात सर्वाधिक सहभाग-108 – टेस्ट क्रिकेट – टीम विजयात सर्वाधिक रन्स -9157

close