अकोल्यात पेट्रोल पंपावर स्फोट, 1 ठार

November 26, 2012 10:33 AM0 commentsViews: 11

26 नोव्हेंबर

अकोल्यातील अशोक वाटीका चौकात असणार्‍या एका बंद पेट्रोलपंपाच्या पेट्रोल टँकमध्ये स्फोट झाला. या स्फोटात 1 जण ठार झाला. गेल्या सहावर्षांपासून हा पेट्रोलपंप बंद आहे. या टँकच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळं शेजारी असणार्‍या राठी पेट्रोलपंपाचंही नुकसान झालंय. या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी होती. स्फोटाचा आवाज ऐकताच एकच गोंधळ झाला.

close