सावत्र आईकडून चिमुरड्याला अमानुष मारहाण

November 27, 2012 5:25 PM0 commentsViews: 11

27 नोव्हेंबर

ठाण्यातल्या मुंब्रा इथं राहणार्‍या एका सावत्र मातेनं 6 वर्षाच्या मुलाला मारहाण करून त्याचं गुप्तांग कापण्याचं हीन कृत्य केलंय. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी सावत्र आईविरोधात गुन्हा नोंदवून तिला ताब्यात घेतलं आहे. 6 वर्षाचा शाहीद शेख आईच्या मृत्यूनंतर वडिल आणि सावत्र आईसोबत राहायचा. पण रिहान शेख या त्याच्या सावत्र आईनं त्याला मारहाण करायला सुरूवात केली. ही गोष्ट त्यानं वडिलांना सांगू नये म्हणून त्याला सतत धमकावत राहीली. परंतु सोमवारी रिहानाने शाहीदला अमानूष मारहाण करून त्याचं गुप्तांग कापलं. शेवटी शेजार्‍यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी शाहीदला उपचारासाठी काळसेकर हॉस्पिटलमध्ये नेलं.

close