फेसबुक प्रकरणी तरुणींवरचे गुन्हे मागे घेण्याची शक्यता

November 29, 2012 11:38 AM0 commentsViews: 5

29 नोव्हेंबर

पालघर फेसबुक प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई झाल्यानंतर शाहीन धाडा आणि रिनू श्रीनिवासन या दोन्ही तरूणींवरचे गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.अशी माहिती सुत्रांनी आयबीएन-लोकमतला दिली. पोलिसांवर कारवाईनंतर पालघरमध्ये सेनेनं बंद पुकारला होता. प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून शाहीन धाडा आणि रिनू श्रीनावासन या दोघींनी पालघर सोडलंय. शाहीन धाडा गुजरातला तर रिनू श्रीनिवासन ही चेन्नईला रवाना झाली आहे. हा वाद शांत होईपर्यंत शाहीन गुजरातमध्येच राहणार आहेत. शाहीनचे वडील आणि पालघरमधील व्यावसायिक फारूख धाडा यांनी आपल्यामुळे पालघरमधील वातावरण बिघडू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. या दोघींच्या कुटुंबीयांना पोलिसांनी संरक्षण देण्यात आलंय. या विषयावर अधिक काही बोलायला ह्या दोघींच्या कुटुंबीयांनी नकार दिला असून हा वाद शांत होईपर्यंत आपल्या मुली पालघर बाहेरच राहतील असं त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलंय.

close