पाकिस्ताननं भारताला सहकार्य करावं – कोंडोलिझा राईस

December 3, 2008 12:03 PM0 commentsViews:

3 डिसेंबर, दिल्लीपाकिस्तान भारताला सर्वप्रकारची मदत करायला तयार असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राईस यांनी दिलीये.त्या दिल्लीत बोलत होत्या.तसंच दहशतवादाशी लढण्यासाठी अमेरिका भारताला पूर्णपणे सहकार्य करायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. "पाकिस्तान भारताला सहकार्य करायला तयार आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी माझ्याशी बोलले. त्यांनी मला तसं आश्वासन दिलं" असं त्या म्हणाल्या.अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राईस बुधवारी भारताच्या एका दिवसाच्या दौर्‍यावर आल्या होत्या. मुंबई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

close