नाशिक जिल्हापरिषदेत विरोधकांचं 36 तासांपासून ठिय्या आंदोलन

November 30, 2012 4:09 PM0 commentsViews: 8

30 नोव्हेंबर

नाशिक जिल्हापरिषदेत शिवसेनेसह 27 विरोधकांचं गेल्या 36 तासांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार निधीवाटपाबाबत पक्षपातीपणा करत असल्याची त्यांची तक्रार आहे. उपलब्ध निधीपैकी सत्ताधार्‍यांना 70 टक्के निधीचं वाटप केलं आणि विरोधकांना 30 टक्के निधी देण्यात आला म्हणून नाराज विरोधकांनी हे आंदोलन सुरु केलं. याबाबत वेळोवेळी निवेदनं देऊही फरक न पडल्यानं या सदस्यांनी कालच्या बैठकीपासून सभागृहातच ठाण मांडलंय. गेल्या 36 तासांपासून सदस्यांनी सभागृहातच मुक्काम केला आहे.

close