‘भुजबळांची संपत्ती 3 वर्षात 21कोटींवरुन 2100कोटींवर’

November 29, 2012 12:41 PM0 commentsViews: 30

29 नोव्हेंबर

सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती गेल्या 3 वर्षात 21 कोटींवरुन एकवीसशे कोटी झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांनी केला. भुजबळ कुटुंबीय इतके श्रीमंत कसे झाले असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. आम्हाला याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मगणी सोमय्या यांनी केली. या आरोपाचा पुरावाच सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समिर भुजबळ यांच्या संपत्ती 2009 मध्ये 21 कोटी दाखवण्यात आली होती आणि आता 2012 मध्ये म्हणजे तीन वर्षांनंतर आज भुजबळ कुटुंबीयाची संपत्ती एकवीशे कोटींवर गेली कसं काय ? सवाल सोमय्यांनी उपस्थित केला. तसेच तर श्वेतपत्रिका म्हणजे आघाडी सरकार टिकवण्यासाठी एकमेकांना सांभाळुन घेण्याची धडपड सुरु आहे आणि अजित पवार यांना क्लीनचीट देण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत असा आरोपही सोमय्या यांनी केलाय.

close