पोलिसांवर कारवाईच्या निषेधार्ध पालघर बंद

November 28, 2012 9:55 AM0 commentsViews: 15

28 नोव्हेंबर

पालघर फेसबुक प्रकरणी पोलीस अधिकार्‍यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेनं बंद पुकारला आहे. नागरीकांनीही या बंदला चांगला प्रतिसाद दिलाय. आज सकाळपासूनच दुकानं, मार्केट, हॉटेल्स बंद आहेत. तसेच शाळा आणि कॉलेजही बंद ठेवण्यात आल्या असून जवळील बोईसर, सफाळे या भागातही बंदचा प्रतिसाद जाणवतोय. स्थानिक शिवसैनिकांनी कालच या भागातील व्यापार्‍यांना या प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. त्याचाच प्रत्यय सकाळपासून पालघर आणि त्याच्या आसपासच्या भागात पाहायला मिळतोय अधिकार्‍यांवर कारवाई झाली पण दोन्ही मुलींवरचे खटले मात्र अजूनही कायम आहेत. दरम्यान, हा बंद उत्स्फूर्त नसून शिवसेनेच्या भीतीनं करण्यात आलाय असा आरोप विरोधकांनी केला आहे.

close