लोकसभेतला तिढा अखेर सुटला

November 29, 2012 1:10 PM0 commentsViews: 6

29 नोव्हेंबर

हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे 4 दिवस गोंधळात वाहून गेल्यानंतर आजपासून संसदेचं कामकाज सुरळीत सुरु झालंय. आज लोकसभेचं कामकाज सुरू होताच लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी एफडीआयच्या मुद्यावर संसदेत 184 अंतर्गत चर्चा करण्याची घोषणा केली. तर राज्यसभेत नियम 168 अंतर्गत चर्चा आणि मतदान होणार आहे. संसदेत पुढच्या आठवड्यात 4 आणि 5 डिसेंबरला चर्चा आणि मतदान होईल. दरम्यान, यूपीए सरकारला एक धक्का बसलाय, तो म्हणजे राज्यसभेत एफडीआयच्या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचं समाजवादी पार्टीनं जाहीर केलं आहे.

close