संभाजी ब्रिगेडकडून 11 वीच्या इतिहासाच्या पुस्तकाची होळी

November 26, 2012 2:06 PM0 commentsViews: 13

26 नोव्हेंबरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अकारावीच्या इतिहासाच्या पुस्तकाची संभाजी ब्रिगेडनं होळी केली. या पुस्तकात महाराष्ट्रातल्या महापुरूषांना डावलल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळानं इयत्ता अकारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात महाराष्ट्रातील बहुजन समाजातील महापुरूषांचा इतिहास संकुचित वृत्तीनं कमी ओळीत छापलं आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडनं केलाय. महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक त्वरीत दुरूस्त करण्यात यावं आणि चुकीचा इतिहास लिहणार्‍यांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

close