मुळा धरणातून जायकवाडीसाठी सोडलं 3 टीएमसी पाणी

November 28, 2012 10:10 AM0 commentsViews: 3

28 नोव्हेंबर

मराठवाड्यासाठी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून 3 टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. पण हे पाणी सोडण्यास जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. हे पाणी सोडण्याच्या विरोधात शिवराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नदीत बसून आंदोलन केलं. पण पाण्याचा वेग वाढताच आंदोलकांनी आंदोलन पाण्यात सोडून बाहेर आले. दरम्यान, मराठवाड्याला पाणी देण्यासाठी होणार्‍या विरोधाबाबत मराठवाड्यातल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. हा विरोध थांबला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी दिला आहे.

close