इन्कम टॅक्स विभागाची 56 साखर कारखान्यांना नोटीस

November 29, 2012 1:19 PM0 commentsViews: 5

29 नोव्हेंबर

राज्यातील साखर उद्योगासमोर सध्या मोठ संकट उभं राहीलंय. पाच हजार कोटी रूपये थकीत असल्याने इन्कम टॅक्स विभागाने राज्यातील 56 साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे अशी माहिती महाराष्ट्राचे संसदीय कामकाज आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यात दिली. इन्कम टॅक्स विभागानं साखर कारखान्यांना नोटीस बजावली असल्यांनं साखर कारखान्यांची बँकखाती सुध्दा गोठवली जाऊ शकतात. त्यामुळे या प्रश्नावर दिल्लीत जाउन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

close