केजरीवालांच्या पक्षाचं नाव ‘आम आदमी पार्टी’

November 24, 2012 10:13 AM0 commentsViews: 6

24 नोव्हेंबर

इंडिया अगेन्सट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी लोकपालसाठी जनआंदोलनानंतर राजकारणात उडी घेतली. पक्षाची घोषणा करून केजरीवाल यांनी एक एक गौप्यस्फोट करत वातावरण तापवलं. डोक्यावर 'मै आम आदमी' अशी टोपी परिधान करुन केजरीवाल यांनी आपले आंदोलन सुरु केले. अखेर याच टोपीवर लिहलेलं नावं पक्षाचं नावं असणार आहे. केजरीवाल यांनी अखेर आपल्या पक्षाला नावं 'आम आदमी पार्टी' असं जाहीर केलंय. आज शनिवारी आयएसीचे कार्यकर्ते मयांक गांधींनी सुचवलेल्या नावाला 300 सदस्यांचं अनुमोदन केलं. याबाबत उद्या दिल्लीत जंतरमंतरवर मैदानावर अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. पक्षा कार्यपद्धतीच्या मसुद्यावर सध्या काम चालू असून संपूर्ण मसुदा आणि ध्येय धोरणं ही लोकांसमोर मांडणार असल्याचं गांधी यांनी सांगितलं.तसेच आमच्या पक्षाला अध्यक्ष किंवा सरचिटणीस नसून एक राष्ट्रीय समन्वयक असणार आहे. आम्ही घराणेशाहीला आळा घालण्यासाठी पक्षात कडक नियम करणार असल्याचंही गांधींनी स्पष्ट केलं.

close