कोल्हापूर पालिकेनं राबवली शुन्य कचरा मोहीम

November 26, 2012 2:10 PM0 commentsViews: 21

26 नोव्हेंबर

कोल्हापूर महापालिकेनं आज शहरात शून्य कचरा मोहीम राबवली. त्यामुळे आज एक दिवस का होईना शहरातला कचरा काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. कोल्हापूर शहरातली कचर्‍याची समस्या गंभीर आहे. महापालिकेनं अनेक उपाययोजना करुनही शहरातला कचरा जैसे थे अवस्थेत आढळतो. त्यामुळं महापालिकेनं आज ही मोहीम राबवली. तसंच आज जनप्रबोधन करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं शहरातून रॅलीही काढण्यात आली. या रॅलीत महापौर कांदबरी कवाळे, कामगारमंत्री हसन मुश्रीफ हेही सहभागी झाले होते. दरम्यान, शुन्य कचरा मोहीमेंतर्गत प्लॅस्टिक कमी करण्यापासून ते अत्याधुनिक उपकरण वापरण्याचा निर्णय मनपानं घेतला आहे. तसंच या योजनेसाठी 1 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

close