परळीत अज्ञात जमावाने एसटी बस पेटवली

November 28, 2012 10:15 AM0 commentsViews: 7

28 नोव्हेंबर

परळीमध्ये आज सकाळी काही अज्ञात जमावांने एक एसटी बस पेटवून दिली आहे तर दोन बसेसवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीत बसचालक रामराव भिसे गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी परळी शहर पोलिसांत अज्ञात आरोपींच्या विरूद्ध गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस निरिक्षक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, परळीत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला असून जाळपोळ आणि दगडफेकीचे कारण अजूनही समजू शकले नाही.

close