मराठवाड्याला जादा पाणी सोडण्यास शेतकर्‍यांचा विरोध

November 26, 2012 2:14 PM0 commentsViews: 2

26 नोव्हेंबर

मराठवाड्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला असल्यामुळे इतर धरणातून पाणी सोडण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहे. येत्या 28 आणि 29 नोव्हेंबरला मराठवाड्यासाठी 6 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचा नगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कडाडून विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात कोपरगावात आज रास्ता रोको करण्यात आला होता. नगर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्यानं शेती धोक्यात असल्याचं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. यापूर्वीच भंडारदरा धरणातून अडीच टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्यात आलंय.आता पुन्हा 6 टिएमसी पाणी दिलं तर तीव्र पाणीटंचाई होण्याची शक्यता असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. कोपरगावचे सेना आमदार अशोक काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नगर मनमाड हायवे रोखण्यात आला होता.

close