इंदू मिलबाबत मुख्यमंत्र्यांचं कोरडं आश्वासन

December 3, 2012 3:31 PM0 commentsViews: 9

03 डिसेंबर

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळेल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलंय पण ती कधी मिळणार याचं उत्तर मात्र देण्यास मात्र त्यांनी टाळलंय. मागील शनिवारी रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी दिल्लीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 4 ते 5 डिसेंबर रोजी संसदेत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. मात्र 4 तारीख उद्यावर येऊन ठेपला असताना अजूनही कोणत्याही हालचालीना वेग न आल्यामुळे दलित संघटनेत चिंतेचं वातावरण पसरलंय. 6 डिसेंबरपर्यंत जागा नाही मिळाली, तर मिल ताब्यात घेऊ असा इशारा रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी दिला होता. त्यामुळे इंदू मिलचा वाद संपवण्याची चिन्हं दिसत नाही.

close