ठाण्यात धावणार ट्राम

November 28, 2012 10:31 AM0 commentsViews: 5

28 नोव्हेंबर

ठाणेकरांच्या वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्यासाठी शहरात 'लाईट रेल्वे ट्रान्सपोर्ट' (एलआरटी) सेवा सुरु करण्याचा निर्णय ठाणे पालिकेनं घेतला आहे. ही सेवा 2014 पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. ठाण्याची वाढती लोकसंख्या पाहता राज्य सरकारनं मोनो आणि मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव आणण्यासाठी प्रयत्न केले. पण त्याला होत असलेला उशीर पाहता महापालिकेनं 'लाइट रेल्वे ट्रान्सपोर्ट'ची संकल्पना आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात पहिल्यांदाच ठाणे महापालिका एलआरटीचा उपक्रम समोर आणणार आहे. ही संकल्पना प्रदूषणमुक्त आहे. 5 ते 6 डब्बे असणार्‍या या एलआरटी मेट्रो रेल्वेत 150 प्रवासी प्रवास करू शकतात. या प्रकल्पासाठी प्रत्येक किलोमीटरला 50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सुरवातीला घोडबंदर रोड ते आनंदनगर या 10 किलोमीटरवर हा प्रकल्प सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचं काम एका खाजगी कंपनीला देण्यात आलं आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प अस्तित्वात येणार आहे.

close