सहकार संस्थांचा पुरस्कारने होणार गौरव

November 29, 2012 3:38 PM0 commentsViews: 9

29 नोव्हेंबर

राज्यातील सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या संस्थाना पहिल्यादाच सहकार क्षेत्रातील पुरस्कार दिले जाणार आहेत. सहकार महर्षी, सहकार भूषण आणि सहकार निष्ठ अशा प्रकारचे हे पुरस्कार असणार अशी माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिली. एक लाख रक्कमेचा धनादेश, स्मृती चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा पहिला सहकार महर्षी पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्री हनुमान सहकारी दूध व कृषी पुरक सेवा संस्था मर्यादीतला दिला जाणार आहे. दोन डिसेंबरला पुण्यातील बालेवाडी शिव छत्रपती क्रीडा नगरीत राज्यापाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

close