रडत बसू नका आता लढायचंय -उद्धव ठाकरे

December 3, 2012 3:51 PM0 commentsViews: 29

03 नोव्हेंबर

हा राजकीय दौरा नाही तर मी माझ्या कुटुंबाला भेटायला आलोय. आपल्या सगळ्यांना बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. त्यामुळे रडत बसू नका तर लढा असं आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय. पण यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे सध्या राज्यव्यापी दौरा करत आहे. या दौर्‍याची सुरुवात कोल्हापूरपासून झाली. आज कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला आणि भावना व्यक्त केल्या.

close