हैदराबादविरुद्ध जाफरची डबल सेंच्युरी

December 3, 2008 12:21 PM0 commentsViews: 4

3 डिसेंबर, मुंबईसमीर सावंतमुंबईतल्या बीकेसी मैदानावर सुरू असलेल्या हैदराबादविरुध्दच्या रणजी मॅचमध्ये मुंबईनं पहिल्याच दिवसावर वर्चस्व गाजवलं. कॅप्टन वासिम जाफरनं डबल सेंच्युरी करत मुंबईला भक्कम सुरवात करुन दिली. तर अजिंक्य रहाणेनं सेंच्युरी ठोकत त्याला चांगली साथ दिली.मुंबईवरील अतिरेकी हल्यानंतर मुंबईत सुरू झालेली ही पहिली क्रिकेट मॅच. सहाजिकचं या मॅचवर सगळ्यांचच लक्ष होतं. अपेक्षेप्रमाणे मुंबईनं आजचा पहिला दिवस गाजवला. वसिम जाफरची डबल सेंच्युरी मुंबईच्या डावाचं वैशिष्ट्य ठरले. जाफर 204 रन्सवर नाबाद असून त्यात 21 फोर आणि 2 सिक्सरचा समावेश आहे. अजिंक्य राहणेनंही नाबाद सेंच्युरी ठोकत जाफरला चांगली साथ दिली आहे. टीमच्या कामगिरीवर कोच प्रवीण आमरेयांनी समाधान व्यक्त केलं.

close