पुण्यात 11 डिसेंबरपासून भीमसेन महोत्सव

November 26, 2012 5:46 PM0 commentsViews: 12

26 नोव्हेंबर

येत्या अकरा डिसेंबरपासून पुण्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार आहे. यंदा या महोत्सवाचं 60वं वर्ष आहे. 11 ते 16 डिसेंबर दरम्यानन्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग इथं हा महोत्सव सहा दिवस चालणार आहे. सहा दिवसांच्या काळात तब्बल 31 कलाविष्कार आणि जवळपास 40 हून अधिक कलाकारांकडून इथं आपली कला सादर करणार आहे. या महोत्सवाचे संयोजक श्रीनिवास जोशी यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा, पं. राजन-साजन मिश्रा, पं. हरिप्रसाद चौरसिया, कलापिनी कोमकली, नृत्यांगना शोभना चंद्रकुमार, उस्ताद शाहीद परवेझ असे अनेक दिग्गज यंदाच्या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.

close