भालचंद्र मुणगेकरांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान

November 28, 2012 12:24 PM0 commentsViews: 20

28 नोव्हेंबर

महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार राज्यसभा सदस्य आणि अर्थतज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांना देण्यात आला आहे. आज पुण्यात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त फुलेवाडा इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओबीसी असल्यानं त्रास होतो या आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच आपण यापुढेही आपण जे वाटतं ते व्यक्त करत राहणार असंही भुजबळ यांनी सांगितलं.

close