जपानला भूकंपाचा धक्का

December 7, 2012 11:46 AM0 commentsViews: 25

07 डिसेंबर

जपानच्या मियागी भागात आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.3 इतकी होती. सुरुवातीला सुनामीची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण सुनामीचा धोका नसल्याचा निर्वाळा पॅसिफिक सुनामी केंद्रानं दिला. फुकुशिमा अणुऊर्जा केंद्रालाही कोणताही धोका नाही. पण आजच्या या भूकंपानं 2011 मधल्या सुनामीची आठवण करून दिली. त्यात जवळपास 20 हजार लोकांचा बळी गेला होता आणि फुकुशिमा अणुऊर्जा केंद्राचं मोठं नुकसान झाल्यानं किरणोत्सर्गाची भीती निर्माण झाली होती.

close