भाजपने बजावली जेठमलानींना कारणे दाखवा नोटीस

November 26, 2012 5:54 PM0 commentsViews: 23

26 नोव्हेंबर

भाजपचे खासदार राम जेठमलानीबाबत भाजपनं कडक भूमिका घेतली आहे. जेठमलानी यांना आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना पक्षातून का काढून टाकू नये अशी विचारणा पक्षानं केलीय. या नोटीशीला राम जेठमलानी यांना 10 दिवसात उत्तर द्यायचंय. जेठमलानी यांनी पूर्ती गैरव्यवहाराच्या आरोपांवरून पक्षाध्यक्ष नितीन गडकरींचा राजीनामा मागितला होता. त्यानंतर सीबीआय संचालकांच्या नियुक्तीवर भाजपनं घेतलेल्या भूमिकेलाही त्यांनी विरोध केला होता. याची किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांना काल पक्षातून निलंबित करण्यात आलं, तर आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

close