गोळ्या झेलू पण मिल ताब्यात घेऊ -आठवले

December 3, 2012 5:33 PM0 commentsViews: 29

03 डिसेंबरडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत इंदू मिलची जागा देण्याबाबत सरकार काही निर्णय घेणार नसल्याचं दिसतं आहे त्यामुळे 6 डिसेंबरला आम्ही इंदू मिलचा ताबा घेऊच यासाठी गोळ्या झेलायची सुद्धा तयारी आहे पण आम्ही इंदू मिलचा ताबा घेऊच कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे असा गंभीर इशारा रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी थेट सरकारला दिला आहे.6 डिसेंबरचा दिवस जसजसा जवळ येतोय, तसतसा इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा पेटू लागलाय. 6 तारखेपर्यंत स्मारक नाही झालं, तर कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा निर्माण होईल असं आरपीआयचे नेते जाहीरपणे सांगत आहे.700 ते 800 कार्यकर्ते शहीद व्हायला तयार आहेत. त्यातून काही घडलं तर आमचा नाइलाज असेल.6 डिसेंबरपर्यंत जागा मिळाली नाही, तर आमचे कार्यकर्ते इंदू मिलमध्ये घुसतील आणि लॉ अँड ऑर्डरचा मुद्दा निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा आठवलेंनी दिला.6 तारखेची डेडलाईन आरपीआयने आधीच दिली होती. म्हणून मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच केंद्रीय मंत्र्यांना भेटतायत. इंदू मिलची मध्य मुंबईतली साडे बारा एकर सध्या NTC या केंद्र सरकारच्या महामंडळाच्या ताब्यात आहे. तिची बाजारभावानुसार किंमत 3200 कोटी रुपये इतकी आहे. ही जमीन स्मारकासाठी द्यायला तत्त्वतः मान्यता असली आणि सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असल्या, तरी जमीन नेमकी कधी मिळणार, हे मात्र सरकार सांगत नाहीये.तर इंदू मिलबाबत चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर घोषणा करू असं आश्वासन आनंद शर्मा यांनी दिलंय.रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट आक्रमक झाले आहेत. तसंच राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही या स्मारकासाठी आग्रही मागणी केलीये. या विषयाचं राजकारण होतंय, हे दुदैर्वी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.इंदू मिलची जागा मिळाली नाही, तर रिपब्लिकन कार्यकर्ते इंदू मिलचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतील, अशी दाट शक्यता आहे. म्हणून संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात येत आहे.

close