राजकारण्यांचं माफीनामा सत्र

December 3, 2008 12:22 PM0 commentsViews: 1

3 डिसेंबर, मुंबई मुंबईवर दहशतवाद्यांचा हल्ला होत असताना राजकारणी गप्प होते. कमांडोंनी अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर ही लोक बोलायला लागली. अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर शिवसेनेचं मुखपत्र ' सामना 'तून जहरी टीका झाली होती. हेमंत करकरे शहीद झाल्यानंतरही शिवसेनेने टिकेबद्दल माफी मागितली नव्हती. पण कालच आयबीएन लोकमतच्या एका कार्यक्रमात शिवसेनेच्यावतीनं आमदार नीलम गोर्‍हे यांनी माफी मागितलीय. ' हेमंत करकरेंवरील टीका व्यक्तिगत नव्हती. एटीएस पथकात महिला अधिकारी असाव्यात, एवढीच मागणी होती. शिवसेनेच्यावतीन मी माफी मागत आहे ', असं नीलम गोर्‍हे म्हणाल्या. तर ताजवरील कारवाईत लष्कराचे मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले. त्यांच्या वडिलांवर केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंद यांनी झोंबणारी टीका केली होती आणि वर त्यांची माफी मागायलाही नकार दिला होता. आता मात्र लोकदबावापुढे झुकून अच्युतानंद यांनी माफी मागितलीय. दुसरीकडे शहिदांना श्रद्धांजली वाहणार्‍या महिलांवर भाजपचे प्रवक्ते नक्वी यांनी अशोभनीय टीका केली होती. आरएसएसनंही त्यांची पाठराखण केली होती. पण जनतेतून व्यक्त होणारा रोष पाहून त्यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे.

close