कामगारांचा ओम राजे निंबाळकरांना घेराव

November 28, 2012 1:13 PM0 commentsViews: 41

28 नोव्हेंबर

शिवसेनेचे आमदार ओम राजे निंबाळकर आणि तेरणा कारखान्यातील कर्मचार्‍यांचा वाद चांगलाच चिंघळला आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जप्तीच्या कारवाई नंतर आज आमदार ओम राजे निंबाळकर यांनी कारखान्यात कागद पत्र आणण्यासाठी प्रवेश करण्यासाठी गेले असता संतप्त तेरणा कारखान्यातील कर्मचार्‍यांनी आमदार ओम राजे निंबाळकरांना कारखान्याच्या गेटवर अडवले. यावेळी आमदार आणि कामगार यांच्यात वाद झाला. संतप्त कामगारांनी आमदाराच्या विरोधात घोषणाबाजी केली. वातावरण चिघळणार हे लक्षात येताच पोलिसांनी मध्यस्ती करुन आमदार आणि कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ओम राजे निंबाळकर यांनी कामगार हे पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या सांगण्यावरुन आक्रमक झाले असल्याचा आरोप केला आहे.

close