नृत्यमहर्षी पार्वतीकुमार यांचं निधन

November 29, 2012 5:37 PM0 commentsViews: 10

29 नोव्हेंबर

भरतनाट्यम्‌चे गुरू आचार्य पार्वतीकुमार यांचं मुंबईत निधन झालंय. ते 94 वर्षांचे होते. आचार्य पार्वतीकुमार यांचं मूळ नाव जगन्नाथ महादेव कांबळी असं होतं. त्यांचा जन्म गिरगावमध्ये झाला. स्वयंअध्ययनातून त्यांनी नृत्यकला आत्मसात केली. 'दुर्गा झाली गौरी' या गाजलेल्या नृत्यनाट्याचं नृत्यदिग्दर्शन त्यांनी केलं होतं. गुरु रतीकांत आर्य यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे धडे गिरवले. अनेक वैशिष्ट्यपूर्ण नृत्यरचना त्यांनी साकारल्या. 1968 साली तंजावूर नृत्यालयाची त्यांनी स्थापना केली. पार्वतीकुमार यांच्या निधनानं शास्त्रीय नृत्याचं शिक्षण देणारे तपस्वी गुरु हरपले आहेत.

close