सागर सहानी अपहरण आणि हत्येप्रकरणी 6 आरोपींना जन्मठेप

December 7, 2012 12:52 PM0 commentsViews: 3

07 डिसेंबर

पुण्यातल्या सागर सहानी अपहरण आणि हत्येप्रकरणी 11 पैकी 6 आरोपींना आज शिवाजीनगर कोर्टाने शिक्षा सुनावली. 6 दोषींना जन्मठेप आणि मोक्काअंतर्गत 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 14 ऑगस्ट 2005 रोजी पुण्यातून सागर सहानी यांचं अपहरण करण्यात आलं होतं. 18 ऑगस्ट रोजी गुजरातमध्ये त्याचा मृतदेह सापडला होता. 15 लाख रुपयांची खंडणी देऊनही सागर सहानीची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एकूण 12 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एका आरोपीचा सुनावणी दरम्यानच मृत्यू झाला. उरलेल्या 11 पैकी 6 दोषींना कोर्टाने आज शिक्षा सुनावली. जितेंद्र मोडा, रावितसिंग सींग भदोरिया, भिखूभाई खानकी, प्रसाद शेट्टी, छोटू ऊर्फ अरविंद चौधरी अशी या दोषींची नावं आहेत.

close