एफडीआयचा तिढा, संसदेचं कामकाज तहकूब

November 27, 2012 10:12 AM0 commentsViews: 5

27 नोव्हेंबर

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होऊन चार दिवस झाले असले तरी गोंधळामुळे कोणतंही कामकाज झालेलं नाही. राज्यसभेचं कामकाज परवापर्यंत तहकूब करण्यात आलंय. एफडीआयच्या तिढ्यावर चर्चा करण्यासाठी यूपीएच्या समन्वय समितीची आज सकाळी बैठक झाली. त्यानंतर बोलताना, एफडीआयवर मतदानाचा निर्णय अध्यक्षच घेतील असं संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केलं. तर आपल्याला बहुमताची चिंता नसल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं. यूपीएचे मित्रपक्ष एफडीआयवर मतदान घेण्याच्या विरोधात असल्याचं समजतंय. तर द्रमुकनं सरकारच्या बाजूनं मतदान करण्याची घोषणा दिलंय. त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

close