गुरुवारी सादर होणार श्वेतपत्रिका

November 28, 2012 2:53 PM0 commentsViews: 4

28 नोव्हेंबर

येणार येणार म्हणून कित्येक दिवस रखडलेली सिंचनाची श्वेतपत्रिका अखेरीस गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार आहे. सिंचनाची श्वेतपत्रिका गुरुवारी म्हणजे उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार आहे. यात राज्यातल्या सर्व सिंचन प्रकल्पांची खर्चासह माहिती दिली जाणार आहे. पण सिंचन घोटाळ्यातल्या बाबींचा मात्र यात उल्लेखही नाहीय अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. श्वेतपत्रिका मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच हा विस्तार व्हावा, असा आग्रह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करणार आहेत. अजित पवारांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्यासाठीच राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

श्वेतपत्रिकेतले महत्त्वाचे मुद्दे आणि दावे काय असणार आहेत ?

- सध्या राज्याची एकूण सिंचन क्षमता 28 टक्के – गेल्या 10 वर्षात 70 टीएमसी पाणी बिगर सिंचनासाठी दिलं गेलं- गेल्या 10 वर्षांत 12 लाख 47 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं- सध्या 29 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली- गेल्या 10 वर्षांत सिंचनावर 42 हजार कोटींचा खर्च भूसंपादन, पुनर्वसन, विविध परवानग्यांना विलंबामुळे प्रकल्पांच्या खर्चात वाढ- भूसंपादन आणि पुनर्वसनावर 8 हजार कोटींचा खर्च – अस्थापनांवर 5 हजार कोटींचा खर्च – प्रकल्पांवर 30 हजार कोटींचा खर्च – अपूर्ण प्रकल्पांवर 10 ते 12 हजार कोटींचा खर्च – राजकीय हस्तक्षेपांमुळे प्रकल्पांचं स्वरूप बदललं- काही ठिकाणी कालव्याची दिशा, तर काही ठिकाणी बंधार्‍याची क्षमता वाढवली गेली – डीएसआरचा दर इतर राज्यापेक्षा कमी – उसाच्या उत्पादनात दुप्पट वाढ – सध्या 81 मोठे, 122 मध्यम आणि 577 लघू पाटबंधारे प्रकल्प सुरू आहेत- हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 70 हजार कोटी रुपयांची गरज- मोठ्या प्रकल्पांची कामं टप्प्याटप्प्यात पूर्ण करणार- 20 ते 25 टक्क्यांपर्यंत कामं झालेल्या 30 हजार कोटींच्या प्रकल्पांना सध्या स्थगिती- ऊर्वरित 40 हजार कोटींपैकी सध्या 29 हजार कोटींच्या निविदा जारी, तर 11 हजार कोटींच्या निविदा अद्याप बाकी- जलसंपदा खात्याचं वार्षिक बजेट साडे 7 हजार कोटी- बजेटचा विचार करता पुढच्या 5 वर्षांत 29 हजार कोटींची कामं पूर्ण होणं शक्य

close