‘अल् कुबेर’ च्या मालकाची मुंबईत चौकशी सुरू

December 3, 2008 12:36 PM0 commentsViews: 16

3 डिसेंबर, मुंबईसुधाकर कांबळेमुंबईवर हल्ला करण्यासाठी दहशतवादी समुद्रमार्गानं अल् कुबेर नावाच्या बोटीतून आले. गुजरातमार्गे आलेली ही बोट अतिरेक्यांनी हायजॅक केली होती. या बोटीचा मालक विनोद मसानी याची सध्या मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. ही बोट नक्की कुठे हायजॅक केली ?, बोटीत नक्की किती माणसं होती ?, बोट हायजॅक करताना कोणी प्रत्यक्षदर्शी होते का ? या प्रश्नांची पोलीस शोध घेत आहेत. या बोटीचा मालक विनोद मसानी काही दिवस गायब होता. त्याचे अतिरेक्यांशी काही संबंध होते का ?, त्यां बोट हरवल्याची तक्रार केली होती का ? अशा विविध प्रश्नांचा पोलीस आणि नेव्ही शोध घेत आहेत.

close