आडत्यांचा संप सुरूच

December 4, 2012 3:04 PM0 commentsViews: 6

04 डिसेंबर

आडत्यांना यापूर्वी 8 टक्के कमिशन दिलं जायचं. मात्र त्यामध्ये कपात करत ते 6 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आडते गेल्या 6 दिवसांपासुन संपावर गेलेले आहेत. पण याचा थेट फटका शेतकरी, व्यापार्‍यांना बसतोय. नाशिकला डाळिंब, कोल्हापूरला गुळ आणि पुणे-मुंबईत भाजीपाला खरेदीविक्री करणार्‍या सर्व मोठया मार्केटवर परिणाम झाला आहे. कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांच्याबरोबर काल व्यापार्‍यांची बैठक झाली. मात्र यामध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे उद्या पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान, आम्ही शेतकर्‍यांना माल विकायला मदत करतोय त्यांना नुकसान सोसावं लागणार नाही यासाठी प्रयत्न करत असल्याची भूमिका पणन विभागाचे अधिकारी बी.जी.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

close