चौथार्‍याच्या रक्षणसाठी सेनेचा सैनिकांना ‘बुलावा’

December 10, 2012 10:20 AM0 commentsViews: 7

10 डिसेंबर

शिवसेनेने आज मुंबईतील सर्व शिवसैनिकांना शिवाजी पार्क येथे एकत्र येण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीची जागा मोकळी करण्यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता असल्याने, शिवसेनेने सर्व शिवसैनिकांना एकत्र जमण्याचे आदेश दिलेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवाजी पार्कवर अंत्यविधी झालेली जागा मोकळी करण्यासंदर्भात महापालिकेने शिवसेनेला नोटीस बजावली होती. पण या नोटीसीचा कालावधी उलटुनही ही जागा शिवसेनेनं मोकळी केलेली नाही. अंत्यविधी झालेल्या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मारक बनावं ही शिवसेनेची मागणी आहे. त्यामुळे शिवसेनेनं हा भावनिक मुद्दा करत अंत्यविधीची जागा मोकळी करण्यास नकार दिलाय. तसेच अंत्यविधीच्या ठिकाणी शिवसैनिकांनी 24 तास पहारा ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवाजी पार्कात पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे.

close