भारतीय ऑलिम्पिक महासंघ निलंबित होण्याची शक्यता

November 28, 2012 4:28 PM0 commentsViews: 16

28 नोव्हेंबर

आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघ भारतीय ऑलिम्पिक महासंघाला(IOC) निलंबित करण्याची शक्यता आहे. आयओसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आयओएवर निलंबाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघानं दिलेले इशारे मानले नसल्यानं त्यांच्यावर या कारवाईची नामुष्की ओढावली आहे. आयओएच्या निवडणुका या आयओसीनं दिलेल्या नियमांनुसार व्हाव्यात असा इशारा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिला होता. वारंवार असे इशारे देऊनही आयओएनं त्यावर काहीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे आओसीनं भारतीय ऑलिम्पिक महासंघाला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

close