शिष्यवृत्तीप्रश्नी देवेंद्र फडणवीस यांचे ठिय्या आंदोलन

December 4, 2012 3:18 PM0 commentsViews: 38

04 डिसेंबर

गेल्या दोन शैक्षणिक वर्षापासून ओबीसी आणि व्हिजेएनटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अकराशे कोटी रूपये राज्य शासनाने वितरीत केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे. या गंभीर प्रश्नावर राज्य शासनाने अद्याप कुठली हि पावले उचललेली नाही असा आरोप करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूरच्या जिल्हधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यातआले. ओबीसी आणि व्हिजेएनटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

close