श्वेतपत्रिकेवर हिवाळी अधिवेशनात फक्त औपचारिक चर्चा

November 30, 2012 9:43 AM0 commentsViews: 18

30 नोव्हेंबर

अनेक दिवसांपासून चर्चा असलेली सिंचन श्वेतपत्रिका अखेर गुरूवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आली. महाराष्ट्रातली सिंचनाची प्रगती आणि भविष्यातील वाटचाल या शीर्षकाखाली सिंचनाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. आता येत्या हिवाळी अधिवेशनात या सिंचन श्वेतपत्रिकेवर फक्त औपचारिकता म्हणून चर्चा केली जाणार आहे.

ही श्वेतपत्रिका दोन खंडांमध्ये आहे. श्वेतपत्रिकेवर बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. पण ही श्वेतपत्रिका वेबसाईटवरून जनतेसाठी खुली करण्यात आली आहे. तर पिकाखालील क्षेत्राच्या तुलनेत सिंचित क्षेत्राची टक्केवारी गेल्या 10 वर्षात 5.17 टक्क्यांनी वाढली, असं श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आलंय. त्यामुळे सिंचनाची टक्केवारी गेल्या दहा वर्षांत फक्त 0.1 टक्क्यांनी वाढली, हा आर्थिक सर्वेक्षणातला निष्कर्ष श्वेतपत्रिकेत खोटा ठरवण्यात आलाय. इतकच नाही तर सध्या राज्यातल्या पाचही पाटबंधारे महामंडळांच्या स्थापनेपासूनचा लेखाजोखा या श्वेतपत्रिकेत मांडण्यात आला आहे. पण खटकणारी गोष्ट म्हणजे या श्वेतपत्रिकेच्या दोन्ही खंडांमध्ये कुठेही प्रशासकीय अनियमितता झाली किंवा भ्रष्टाचार झालाय. याबाबत मात्र कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे ही सिंचन श्वेतपत्रिका म्हणजे एक प्रकारचा स्टेटस रिपोर्ट आहे, असं म्हणण्यास वाव आहे.

close