सीएसटीवर स्फोटकं सापडली

December 3, 2008 1:34 PM0 commentsViews: 3

3 डिसेंबर, मुंबई दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या सीएसटी स्थानकात बुधवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास स्फोटकं मिळाली. पार्सल विभागात ही स्फोटकं सापडली. सीएसटी स्टेशनवर दोन बेवारस बॅगा सापडल्या. काही वेळाकरता सीएसटी परिसरात घबराहाट पसरली होती. हा स्फोटकं मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळची असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.पोलिसांनी बॉम्ब निकामी केल्याची माहिती दिली असून लोकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहनही केलं आहे.

close