सिंधुदुर्गात कुडाळमध्ये हत्तींचा उच्छाद

December 7, 2012 2:44 PM0 commentsViews: 23

07 डिसेंबर

सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील गावात जंगली हत्तींनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहेत. कुडाळ तालुक्यातल्या डीगस गावात चार हत्तींच्या कळपानं शेतकर्‍यांच्या नारळीच्या आणि केळीच्या बागाच उद्‌ध्वस्त केल्यात. तसंच साठवून ठेवलेलं भात आणि गवताचाही फडशा पाडलाय. मात्र अजूनही वनविभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे हवालदील झालेल्या शेतकर्‍यांचा संताप अनावर होऊन सिंधुदुर्गात पुन्हा एकदा वनविभागाविरोधात संघर्ष उफाळून येण्याची चिन्हं आहेत.

close