अखेर एफडीआयचा तिढा सुटला ; संसदेत बुधवारी चर्चा

November 28, 2012 5:12 PM0 commentsViews: 3

28 नोव्हेंबर

अखेर संसदेतल्या तिढ्यावर तोडगा निघाला आहे. एफडीआयवर चर्चेसह मतदान घेण्याची तयारी सरकारनं दाखवल्याची माहिती मिळतेय. पुढच्या आठवड्यात मंगळवारी किंवा बुधवारी ही चर्चा होईल. मतदानाची मागणी भाजपनं सोडून द्यावी, यासाठी सरकारनं आज शेवटचा प्रयत्न करून पाहिला. संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांच्याशी चर्चा केली. मतदानाची मागणी मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. पण, भाजप नेते आपल्या मागणीवर ठाम राहीले. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष याबद्दल अंतिम निर्णय घेतील, असं म्हणत कमलनाथ यांनी मतदानाचे संकेत दिले. यामुळे गेले चार दिवस ठप्प असलेल्या संसदेचं कामकाज सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एफडीआयला कुणाचा पाठिंबा आहे, कुणाचा नाही, त्यामुळे सध्या सरकारची बाजू कशी भक्कम दिसतेय ?

एफडीआयवर मतदानलोकसभेची सदस्यसंख्या : 544बहुमताचा आकडा : 272

एफडीआयला पाठिंबायूपीए (254) + राजद (4) + धर्मनिर्पेक्ष जनता दल (3) एकूण : 261एफडीआयला विरोधएनडीए (152) + डावे पक्ष (24)एकूण : 176

एफडीआयवर मतदानमतदानाला गैरहजर (शक्यता)समाजवादी पक्ष (22) + बहुजन समाज पक्ष (21) + तृणमूल काँग्रेस (19) एकूण : 62

- एकूण 62 खासदार गैरहजर राहिल्यानं लोकसभेची सदस्यसंख्या 544 वरून 482 होईल- त्यामुळे बहुमतासाठी लागणारी सदस्यसंख्या असेल 241- सध्याच्या परिस्थितीत परकीय गुंतवणुकीला पाठिंबा देणार्‍यांची संख्या 261 आहे- त्यामुळे एफडीआयवर संसदेत मतदान झालंच तरी सरकारवर काही परिणाम होणार नाहीपाठिंबा (261) विरोध (176) गैरहजर (62)

close