सबसिडी योजनेवर निवडणूक आयोगाचा आक्षेप

December 4, 2012 3:43 PM0 commentsViews: 5

04 डिसेंबर

केंद्र सरकारच्या पैशांच्या रुपात सबसिडी देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर निवडणूक आयोगानं तीव्र आक्षेप नोंदवलाय. हिमाचलप्रदेश आणि गुजरातमध्ये निवडणुका पार पडेपर्यंत ही योजना कुठल्याही प्रकारे राबवली जाऊ नये असं सख्त आदेश आयोगानं दिले आहेत. गुजरातमध्ये निवडणूक सुरू असताना केंद्र सरकारनं या योजनेची घोषणा केली. हे निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन असल्याची तक्रार गुजरात भाजपनं केली होती. त्यावर उत्तर देताना या योजनेची घोषणा सरकारनं मार्चमध्येच केली होती, असं सरकारचं म्हणणं आहे.

close