शरद पवारांवरील पुस्तक प्रकाशनाला अजितदादा गैरहजर

December 7, 2012 2:48 PM0 commentsViews: 3

07 डिसेंबर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जीवनावर 'लोकनेता शरद पवार' या नावानं राम कांडगे यांनी पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचं प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते होणार होतं. पण या कार्यक्रमाला अजित पवार शेवटपर्यंत आले नाहीत. त्यामुळे पुस्तकाचं प्रकाशन आर.आर.पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. अजित पवारांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण शपथविधीनंतर कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे अजित पवार यांना पोहोचण्यास उशीर होतोय असं संयोजकांनी सांगितलंय.

close