येडियुरप्पांचा भाजपला अखेर रामराम

November 30, 2012 7:45 AM0 commentsViews: 8

30 नोव्हेंबर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांना पत्र लिहून त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून येडियुरप्पा आणि पक्षाचे संबंध ताणले गेले होते. खासकरुन कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा वाद विकोपाला गेला होता. तेव्हापासूनच येडियुरप्पा पक्ष सोडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

close